E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सिंहगड रस्ता उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत करणार
Samruddhi Dhayagude
05 May 2025
कोंडी फोडण्यासाठी दुभाजक तोडण्याचा निर्णय
पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम हा उड्डाणपूलाचे उद्घाटन १ मे रोजी करण्यात आले. हा पूल वाहतूकीसाठी खुला झाल्यानंतर वाहन चालक वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतील असा दावा केला जात होता. परंतु पुलावर एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागून झालेल्या वाहतूक कोंडीत वाहनचालकांचा श्वास कोंडला. पुलावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांनी पुणे महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे. सिग्नलमुळे कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यावर पुणे पालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकार्यांची शनिवारी तातडीने बैठक पार पडली. या बैठकीत वीर बाजी पासलकर चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांचे ‘सिक्रोनायझेशन’, दुभाजक तोडणे आणि स्वतंत्र मार्गिका करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने उपाय योजना केल्यामुळे शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीला या भागातील नागरिक त्रासले आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन देखिल वाहतूक कोंडी न फुटल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हा पूल बांधून झाल्याने उद्घाटनाकडे लक्ष लागले होते. उद्घाटन झाल्यानंतर एकाच दिवसात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचा उत्साह मावळला होता. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यावर वीर बाजी पासलकर चौकातील वाहतूक सिग्नलचा कालावधी वाढविणे गरजेचे होते. मात्र, पालिका आणि वाहतूक पोलिसांमधील नियोजनाच्या अभावामुळे पूल वाहतुकीस खुला झाल्यावर पहिल्याच दिवशी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आले होते. शनिवारी झालेल्या बैठकीला महापालिकेचे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, तसेच पालिका आणि पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांचे सिक्रोनायझेशन करावे, तसेच अन्य काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा आढावा घेण्यात आला.
या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी काही ठिकाणी दुभाजक तोडावे लागणार आहेत. तसेच नव्याने मार्गिका आखण्याचा निर्णय घेण्यात आला, असे देशमुख यांनी सांगितले.
Related
Articles
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
पुण्यात पाणी साचणारी २३० ठिकाणे
28 May 2025
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
29 May 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात